व्हाय मिस्टर गांधी?
गांधी- अहिंसा, सत्य, स्वदेशी, स्वराज्य, गोरक्षा, समाजातील शेवटच्या
घटकाचा उद्धार.
- १९६२,१९६५,१९६७,१९७२,१९९९,२००८, हि वर्षे आठवली तर पहा अहिंसक राहणे किती परवडण्यासारखे आहे ते पहा.
- सत्य १० १५ वर्षे न्यायालयाच्या पायर्या झिजवून मिळणाऱ्या गोष्टीला न्याय म्हणावा का? न्याय करण्यात दिरंगाई म्हणजेच न्याय नाकारणे
- १९९१ गांधींचा वारसा चालावाण्याचा ठेका घेतलेल्या पक्षानेच जागतिकीकरण स्वीकारून स्वदेशीला गाडून टाकले.
- स्वराज्य किती नागरिकांना वाटते कि माझे स्वतःचे राज्य आहे देशात- सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या, आणि मेट्रो नसलेल्या शहरातल्या लोकांनी स्वतःलाच विचारावे.
- गोरक्षा- एका बाजूला गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्या चालवायच्या आणि दुसर्या बाजूला देशात गोमांस खाणार्याच्या कत्तली करायच्या. जर सरकारने ठरवले कि कोणी काय खायचे आणि काय नाही याला स्वातंत्र्य म्हणायचे का?
- समाजातील शेवटचा घटक- यात सर्व प्रकारचे सामाजिक आर्थिक आणि सांसकृतील घटक यांना खर्या अर्थाने समान संधी उपलब्ध होतात का तर उत्तर नाही आहे.
गांधी त्यांच्या काळातील उत्तम व्यक्तिमत्व होते ज्यांनी भारताच्या
स्वातंत्र्य लढ्याला चालना दिली. टिळकांच्या मृत्यूनंतर जहाल गटाचे ब्रिटीश सरकारवरचे
कमी झालेले दडपण, त्याची पोकळी गांधींनी मवाळ गटाचे नेतृव करून भरून काढली. नंतर
सुभाष बाबूंनी जहालवादी भूमिका घेत जहालांचे नेतृव केले त्याला गांधींनी पूर्ण
पाठींबा दिला. ते सुभाष बाबूंना बोलले होते जर तुला निर्णय योग्य वाटत असेल तर
त्या मार्गाने जा. जर तू यशस्वी झाला तर सर्वात जास्त आनंद मलाच असेल. स्वातंत्र
लढ्याच्या अंतिम टप्प्यात करो या मरो ची भूमिका यात अहिंसेची पायमल्ली त्यांनी
स्वतःच केलेली दिसते.
गांधी हे काळाप्रमाणे विचार बदलणारे व्यक्तिमत्व होते. आजच्या काळात
त्यांची विचारसरणी नक्कीच वेगळी असती. आजच्या काळाच्या चौकटीत त्यांना मोजणे योग्य
नाही. त्यांचे योगदान अमुल्य आहे.

No comments:
Post a Comment